संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो): काजीवाडा येथील डफालची मशीद जागेच्या वादातून मशीद समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षावर हल्ला करण्यात आला. चौघांनी पदाधिकाऱ्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शेख शारेख शेख सलीम, शेख वसीम शेख सलीम (दोघे रा. टाऊनहॉल), चार्ली आणि त्यांचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. शौकत अली जाकेर अली हाश्मी (वय ५१, रा. काजीवाडा, टाऊनहॉल) यांनी तक्रार दिली. त्यानुसार ते भडकल गेट येथील
डफालची मशीदचे बॉडी अध्यक्ष आहे. तर साजेद खान हे मशीदचे उपाध्यक्ष आणि मोहसीन उर रहमान खान हे सदस्य आहेत. शेख शारेख याने मशीदच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्याच्याविरोधात न्यायालयात केस सुरू होती. त्याचा निकाल मशीद समितीच्या बाजूने लागला. त्यानंतर बुधवारी रात्री आरोपींनी त्यांना बाहेर बोलावून मारहाण केली. तपास उपनिरीक्षक सईद खान बीत आहेत
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













